Jump to content

ब्रिक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ब्रिक्स (इंग्लिश: BRICS) हे भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या शिखर संघटनेचे संक्षिप्त नाव आहे. सुरुवातीला फक्त चार देश या संघटनेचे सदस्य होते आणि "ब्रिक" या संक्षिप्त नावाने ओळखले जात होते. २०१० मध्ये दक्षिण आफ्रिका समाविष्ट झाल्यावर संघटनेचे नाव ब्रिक्स झाले.

जगाच्या नकाशावर ब्रिक्स

गटातील देशांची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करणे , परस्परांतील आर्थिक सहकार्य वाढवणे , आर्थिक सुरक्षितता मजबूत करणे , इत्यादी या संघटनेची उद्दिष्ट व कार्ये आहेत

ब्रिक्स राष्ट्र समूहाविषयी

[संपादन]

गोल्डमन सॅकने ब्रिकच्या चार राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांचा वेगवेगळा आणि एकत्रित संशोधन- अभ्यास करून आपले प्रमेय मांडले आणि वेळोवेळी त्याची समीक्षा करून त्यात सुधारणा केली. गोल्डमन सॅकने या चार राष्ट्रांनी काय करावे हे कधीच सुचवले नाही वा त्यावर भाष्यपण केले नाही. परिणामतः जसजशी प्रमेयाची पकड घट्ट होत गेली तसतशी चार राष्ट्रं परस्परांजवळ येत गेली. अजूनही ब्रिक हा अनौपचारिक राष्ट्रसमूहच आहे. २००८ साली चार राष्ट्रांचे परराष्ट्रमंत्री प्रथम एकत्र आले. त्यानंतर आलेल्या जागतिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर ब्रिकला अधिक जवळ येण्याची निकड वाटली, म्हणून १६ जून २००९ रोजी चार देशांच्या राष्ट्रप्रमुखांची पहिली शिखर परिषद रशियातल्या एडातरीनबर्ग येथे संपन्न झाली. विशेष गोष्ट अशी की, ब्रिकची चारही राष्ट्रं जी-२० या प्रगत राष्ट्रांच्या व प्रगतीपथावर असणाऱ्या राष्ट्रांच्या अनौपचारिक राष्ट्रसमूहाचे सदस्य आहेत.

जी-२० या राष्ट्रसमूहांत ब्रिकचा आवाज बुलंद झाला. पहिल्या शिखर परिषदेत चीन आणि भारत यांनी जगाच्या अर्थमंचावर असलेलं ब्रिकचं स्थान त्याला मिळालंच पाहिजे या दिशेने वाटचाल केलीय. जगाच्या भूमीच्या जवळपास एक चतुर्थाश भूमी ब्रिकच्या राष्ट्रसमूहाने व्यापली आहे. तसंच जगाच्या लोकसंख्येच्या ४० टक्के लोकसंख्या ब्रिक राष्ट्रसमूहाची आहे. जगाच्या जी.डी.पी.च्या ४० टक्के जी.डी.पी. ब्रिक राष्ट्रसमूहाचा आहे. याचा साकल्याने विचार करून भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या चार राष्ट्रांनी परस्परांतलं सहकार्य आणि संघटन वाढविण्यावर भर दिला.


इतिहास

[संपादन]
शिखर परिषद
# दिनांक यजमान देश प्रतिनिधि स्थळ नोंद
पहिली परिषद १६ जून २००९ रशिया दिमित्री मेदवेदेव येकातेरिनबुर्ग
दुसरी परिषद १५ एप्रिल २०१० ब्राझील लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा ब्राझिलिया
तिसरी परिषद १४ एप्रिल २०११ चीन हू चिंताओ .
चौथी परिषद २९ मार्च २०१२ भारत मनमोहन सिंग नवी दिल्ली
पाचवी परिषद २६-२७ मार्च २०१३ दक्षिण आफ्रिका जेकब झुमा डर्बन
सहावी परिषद १४-१६ जुलै २०१४ ब्राझील दिल्मा रूसेफ फोर्तालेझा आणि ब्राझिलिया
सातवी परिषद ८–९ जुलै २०१५ रशिया व्लादिमिर पुतिन उफा
आठवी परिषद १५-१६ ऑक्टोबर २०१६ भारत नरेंद्र मोदी गोवा
नववी परिषद ३-५ सप्टेंबर २०१७ चीन शी जिनपिंग . जियामेन

ब्रिक्स परिषद सध्याचे सदस्य प्रतिनिधी

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]