विकिपीडिया:अडवणूक नीती
अडवणूकीद्वारे प्रचालक सदस्यांना व इतर वापरकर्त्यांना विकिपीडियावर संपादन करण्यापासून रोखू शकतात. अडवणूक सदस्य खात्यांवर किंवा आयपी ॲड्रेस किंवा आयपी ॲड्रेसच्या मालिकेवर मर्यादित किंवा अमर्यादित काळासाठी करता येऊ शकते. अडवणूक केलेले सदस्य विकिपीडिया वापरू शकतात पण त्यांना (त्यांच्या चर्चापानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी) संपादने करणे शक्य नसते.
विकिपीडियावरील नासधूस आणि अडथळे थांबवण्यासाठी अडवणूकीचा वापर केला जातो; वापरकर्त्यांना शिक्षा देण्यासाठी नाही. कोणीही सदस्य असे अडथळे लोकांच्या नजरेसमोर आणून प्रचालकांना अडथळे आणणाऱ्या सदस्यांना अथवा आयपी ॲड्रेसला आडवण्याची विनंती करू शकतात
जर अडवणूक काही चुकीमुळे लादली गेली आहे असे संपादकांना वाटत असेल तर त्यांना या अडवणूकीची पुनर्समीक्षा करण्याची विनंती करता येते, अडवणूक आता योग्य नाही किंवा ती चुकीचीच होती असे प्रचालकांना वाटले तर ते अडवणूक उठवू शकतात.