चेरी
चेरी हे थंड हवामानात होणारे, लाल रंगाचे, आंबटगोड चवीचे एक गुठळीदार फळ आहे. याचा रंग लाल, पिवळा व क्वचित काळा असतो. या फळाचा व्यास अर्धा ते सवा इंच असतो. त्याला हिंदी भाषेत आलूबालू म्हणतात.
आरोग्यदायक चेरी
[संपादन]चेरीमध्ये ॲन्थाॅसायनिन नावाचा घटक असतो. हे शरीरातील विभिन्न अंगात होणारी दाह आणि दुखणे कमी करते. असे म्हणले जाते की मधुमेहाच्या रोगात आणि ह्रदय व अन्य ग्रंथीच्या रोगांमध्ये लपलेल्या दाहीचा मोठा वाटा असतो. उंदरांवर केलेल्या प्रयोगांमध्ये पाहिले गेले की चेरीतील ॲन्थाॅसायनिन दाह दूर करण्यासाठी मदत करते.
उत्पादन
[संपादन][१] भारतात चेरी काश्मीर, हिमाचल प्रदेशात, उत्तराखंडात आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये याची पैदाइस केली जाते. जगभरात सन २००७मध्ये २० लाख टन चेरीचे उत्पादन झाले. त्यांपैकी ४०% युरोपमध्ये आणि १३% अमेरिकेत झाले.
काश्मीरी मध्ये चेरीला "गिलास" म्हणले जाते, तर नेपाळ मध्ये याला "पैयुॅं" म्हणून ओळखले जाते. पंजाबीत आणि उर्दूमध्ये "शाह दाना" (شاہ دانہ) म्हणतात. अरबी मध्ये "कर्ज़" (كرز) या नावाने ओळखले जाते.