Jump to content

हृदय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हृदय

हृदय व त्याचे भाग

हृदय हा अवयव अभिसरण संस्था असलेल्या सर्व प्राण्यामध्ये आढळतो. स्नायूनी बनलेल्या हृदयामुळे रक्तवाहिन्यामधून रक्त लयबद्ध रितीने वाहून नेले जाते. इंग्रजीमध्ये ‘कार्डियाक’ हा हृदय संबंधी आलेल्या शब्दाचा उगम ग्रीक भाषेतील कार्डिया (हृदय) शब्दाशी आहे. पृष्ठवंशी प्राण्यामध्ये हृदय हृदयस्नायूनी बनलेले असते. हृदयस्नायू अनैच्छिक असून त्यांच्या पृष्ठभागावर सूक्ष्म दर्शकाखाली पट्टे दिसतात. हृदय प्रामुख्याने हृदयस्नायूनी आणि थोड्या संयोजी उतीनी बनलेले असते. सामान्यपणे मानवी हृदय दर मिनिटास 72 वेळा आकुंचन पावते. सरासरी सहासष्ट वर्षांच्या आयुष्यातील कालखंडामध्ये हृदय पंचवीस लक्ष वेळा अकुंचन पावते. स्त्रियामध्ये हृद्याचे सरासरी वजन 250-300 ग्रॅम आणि पुरुषामध्ये 300-350 ग्रॅम असते. अपृष्ठवंशी प्राण्यामध्ये हृदय म्हणजे एक लहान आकाराची पिशवी किंवा आकुंचन पावणारी नलिका असते. यामधून शरीरास प्रथिने,मेदाम्ले आणि कर्बोदके वाहून नेली जातात. कीटकांचे रक्त रंगहीन असून त्यामधून श्वसनवायूंचे वहन होत नाही. संधिपाद खेकड्यासारख्या प्राण्यामध्ये आणि कोळी आणि मृदुकाय गटातील नळ, म्हाकूळ आणि ऑक्टोपस सारख्या प्राण्यामधील रक्तामध्ये तांबे असलेले हीमोसायनिन नावाचे श्वसनवायू वाहून नेणारे निळ्या रंगाचे रक्तद्रव्य असते. हीमोसायनिन युक्त रक्ताचे वहन या प्राण्यांच्या हृदयामार्फत होते. (पहा रक्त)

हृद्यविकास सस्तन प्राण्यामधील गर्भाच्या अपिस्तर उती मध्य स्तर उती आणि अंतःस्तर उती अशी उती विभागणी झाल्यानंतर मध्यस्तर उतीमधील एका विशिष्ट संयोजी उतीपासून त्रिस्तरीय अवस्थेमध्ये हृद्याचा विकास होतो. हृदयालगतचे हृदयावरण मध्यस्तर उतीपासून तर बाह्य हृदयावरण अंतःस्तर उतीनी बनलेले असते. हृदयाचे आतील आवरण , रसवाहिन्या आणि रक्तवाहिन्या अंतःस्तर उतीपासून बनतात. हृदय स्नायू मात्र मध्यस्तर उतीनी बनलेले असतात. ह्र्दयस्नायू तयार होतानाच काहीं हृदय स्नायूंचे विभाजन होऊन हृदय स्नायू आकुंचन पावण्यासाठी विद्युत संदेश उत्सर्जित करणारे केंद्र तयार होते. या केंद्रास हृदय गतिकारक (पेस मेकर) असे म्ह्णतात. मानवी गर्भामध्ये एकविसाव्या दिवशी पासून गर्भाचे हृदय कार्य करण्यास प्रारंभ करते. गर्भहृदय साधारणपणे दर मिनिटास 75-80 वेळा आकुंचन पावते. गर्भ हृद् याचा वेग पहिल्या महिन्यामध्ये शंभर पर्यंत वाढतो. सातव्या आठवड्यामध्ये तो सर्वाधिक म्ह्णजे 165-185 पर्यंत होतो. याचा वेग या दिवसामध्ये दररोज तीनने वाढतो. नवव्या आठवड्यापासून पंधराव्या आठवड्यापर्यंत तो एकशे बावन्न पर्यंत कमी होतो. या काळात गर्भाचा आकार सु. 25 मिमि एवढा असतो. मूल जन्मण्याआधी स्त्री आणि पुरुष बालकाच्या हृदयाच्या गतीमध्ये कोणताही फरक नसतो. गर्भावस्थेमध्ये पहिल्या महिन्यात हृदयाचे ठोके मिनिटास सरासरी 100 असतात. सातव्या आठवड्यात ते सर्वाधिक म्हणजे 165-185 एवढे होतात. हृदयाचे ठोके वाढण्याचा वेग दररोज 3.3 एवढा वाढतो. नवव्या आठवड्यापासून हृदयाचा वेग 152 पर्यंत कमी होतो. पंधराव्या आठवड्यानंतर तो सरासरी 145 वर स्थिर होतो. जन्मण्या आधी मुलगा आणि मुलीच्या हृदयाच्या वेगामध्ये फरक आढळून येत नाही. हृदय रचना हृदयाची रचना प्राणिसृष्टीमधील संघाप्रमाणे बदलते. शीर्षपाद मृदुकाय सजीवामध्ये दोन कल्ले हृदये आणि एक अतिरिक्त हृदय असते. पृष्ठवंशी प्राण्यामध्ये हृदय शरीराच्या पुढील भागामध्ये उरोपोकळीमध्ये अन्न्नलिकेच्या अधर बाजूस असते. हृदय नेहमी हृदयावरणाने आवेष्ठित असते. हृदयावरण कधीकधी पर्युदरापासून निघाल्यासारखे वाटते. पण हृदयावरण हा पर्युदराचा भाग नाही. पृष्ठवंशी प्राण्यामधील अप्रगत हॅगफिश मध्ये शेपटीमध्ये आणखी एक हृदयासारखा अवयव असतो . हृदय रचना हृदयाची रचना प्राणिसृष्टीमधील संघाप्रमाणे बदलते. शीर्षपाद मृदुकाय सजीवामध्ये दोन कल्ले हृदये आणि एक अतिरिक्त हृदय असते. पृष्ठवंशी प्राण्यामध्ये हृदय शरीराच्या पुढील भागामध्ये उरोपोकळीमध्ये अन्न्नलिकेच्या अधर बाजूस असते. हृदय नेहमी हृदयावरणाने आवेष्ठित असते. हृदयावरण कधीकधी पर्युदरापासून निघाल्यासारखे वाटते. पण हृदयावरण हा पर्युदराचा भाग नाही. पृष्ठवंशी प्राण्यामधील अप्रगत हॅगफिश मध्ये शेपटीमध्ये आणखी एक हृदयासारखा अवयव असतो. मानवी हृदय मानवी हृद याचे वजन 250-350 ग्रॅम असून त्याचा आकार हाताच्या वळलेल्या मुठीएवढा असतो. उरोस्थीच्या मागे आणि पाठीच्या कण्याच्या पुढे उरोपोकळीमध्ये हृदय स्थित असते. हृद्य दोन पदरी हृदयावरणाने वेढलेले असते. बाह्य हृदयावरण तंतुमय असून हृदयाचे संरक्षण उरोपोकळीमध्ये हृदय स्थिर ठेवणे आणि हृदयामध्ये अधिक रक्त साचण्यास प्रतिबंध करते. मानवी हृदय तीन स्थरानी बनलेले असते. हृदयालगतचा हृदयावरण थर हे हृदयाचे पहिले आवरण बाह्य हृदयावरण आणि हृदयालगतचे हृदयावरण यामध्ये एक जलीय पदार्थ असतो. त्यामुळे ह्रदयाची हालचाल होताना घर्षण होत नाही. हृदयाचे मधला थर हृदयस्नायूनी बनलेला असतो. हृदयाचा सर्वात आतील थर हृदंतस्तर या नावाने ओळखला जातो. हा एक पेशीय थर रक्तवाहिन्यांच्या अंतःस्तराशी संलग्न असतो. हृदंतस्थर हृदयाच्या झडपा आणि हृदयाच्या पोकळ्या आच्छादतो. माशाचे हृदय आद्य मत्स्यवर्गीय पृष्ठवंशी प्राण्यामध्ये हृदय एकापाठोपाठ चार कप्प्यानी बनलेले असते. माशाचे हृदय सस्तन प्राण्यांच्या चार कप्प्यांच्या हृदयासारखे मुळीच दिसत नाही. पहिला कप्पा शीर कोटर (सायनस व्हिनॉसस) या नावाने ओळखला जातो. या कप्प्यामध्ये शरीरातील शिरामधून कमी ऑक्सिजनयुक्त रक्त जमा होते. शीर कोटरातून रक्त अलिंदामध्ये जाते. अलिंदामधून ते निलयामध्ये आणि निलयामधून महाधमनी शंकूमध्ये (कोनस आर्टेरिओसस) महाधमनी शंकू महाधमनीमध्ये उघडतो. निलय स्नायूयुक्त असते. महाधमनीमधील रक्त क्लोमामध्ये जाते. क्लोमाभोवती असलेल्या पाण्यातील ऑक्सिजन अभिसरणाने रक्तामध्ये मिसळतो. इतर चार कप्प्याच्या हृद्यामध्ये अधिक ऑक्सिजनयुक्त रक्त निलयामध्ये येते आणि शरीराच्या विविध भागामध्ये पोहोचते. पण माशाच्या हृदयामधील रक्त महाधमनीच्या विविधशाखावाटे शरीराच्या सर्व भागामध्ये पोहोचते. प्रौढ माशाचे हृदय सरळ नलिकेऐवजी इंग्रजी ‘एस’च्या आकारासारखे दिसते. प्रारंभीचे दोन कप्पे अधर बाजूस तर पुढील दोन कप्पे आधीच्या कप्प्यांच्या ऊर्ध्व बाजूस असतात. (चतुष्पाद प्राण्यामध्ये अधर महाधमनीच्या दोन शाखा होतात एक फुफ्फुस धमनी आणि दुसरी ऊर्ध्व धमनी.) अस्थिमत्स्यामध्ये महाधमनीशंकूचा आकार लहान असतो. पक्षी आणि सस्तन प्राण्यांच्या ह्र्दयामध्ये शीर कोटर आणि महाधमनी शंकू या भागांचा अभाव सतो.

मानवी हृदय कार्य

[संपादन]

हृदय त्याकडे आलेले रक्त आत घेत व बाहेर टाकते. हृदयाकडे रक्त आणले जाते व हृदय ते बाहेर फेकते. हृदयाला चार कप्पे (वर दोन कणिर्का-Auricles व खाली दोन जवनिका-Ventricles) असतात. उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असते व डाव्या बाजूला शुद्ध रक्त असते. हृदय हे सतत आकुंचन व प्रसरण पावत असते. त्याचा वेग मिनिटाला ६० ते १०० ठोके असतो. उजव्या बाजूला शरीराकडून आलेले रक्त फुफ्फुसाकडे पाठवले जाते. फुफ्फुसामध्ये रक्तातील कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जाउन प्राणवायू शोषला जातो. हे रक्त हृदयाच्या डाव्या कर्णिकेत आणले जाते. आणि तेथून ते डाव्या जवनिकेतुन शरीरभर पोहोचवले जाते. विविध शरीराची कामे करण्यासाठी प्राणवायू, साखर व इतर मूलद्रव्ये ही रक्तामार्फत शरीरभर नेली जातात. शरीर लागेल त्याप्रमाणे ऑक्सिजन व इतर पौष्टिक पदार्थ घेते व परत अशुद्ध रक्त हृदयाकडे पोहचवते. रक्त जेव्हा धमन्यातून वाहते तेव्हा धमन्यांचा त्याच्यावर दाब पडतो त्याला रक्तदाब असे म्हणतात.

कप्पे व रक्तप्रवाहाचे मार्ग

हृदयाला काम करण्यासाठी त्यातील काम करणाऱ्या स्नायूंना शर्कराप्राणवायू या मूलभूत ऊर्जा निर्माण करणाऱ्या घटकांचा सतत पुरवठा होणे अत्यंत आवश्यक असते. शर्करा आणि प्राणवायू हे रक्तातूनच मिळतात आणि ते रक्तवाहिन्यांद्वारे हृदयाच्या सर्व भागांत पोहोचविले जातात. हृदयाच्या स्नायुंना प्रसरन काळात रक्तपुरवठा होत असतो. हृदयाला सतत स्पंदन निर्माण करणाऱ्या एका विद्युतस्त्रोताची आवश्यकता असते. हा विद्युतस्त्रोत कर्णिकेच्या पेशीभित्तीमध्ये असतो. विद्युत स्पंदन हे हृदयाच्या कर्णिकेत तयार होऊन सर्व हृदयभर पसरविले जाते. त्यामुळे हृदयाच्या आकुंचन पावण्याची क्रिया होऊन हृदयाचा पंप काम करू लागतो. त्यासाठी सतत असा विद्युतस्त्रोत आवश्यक असतो. मानवीहृदय मिनिटाला सरासरी ७२ वेळा आकुंचन प्रसरण पावते.

कप्पे व कार्य

[संपादन]
  1. उजवी कर्णिका
  2. डावी कर्णिका
  3. उजवी जवनिका
  4. डावी जवनिका
  • हृदयाला चार झडपा (वॉल्व्ह) असतात:
    1. २ डाव्या बाजूला (मिट्रल आणि एऑर्टिक)
    2. २ उजव्या बाजूला (पल्मनरी आणि ट्रायकस्पीड), ज्यामुळे रक्त प्रवाह एका दिशेला वाहतो.


  • कर्णिकांमध्ये धमन्यांमार्फत आणलेले रक्त जाते. कर्णिका व जवनिकांमध्ये झडपा असतात. प्रथम कर्णिका आकुंचन पावतात. त्यामुळे झडपा उघडून रक्त कर्णिकेतून जवनिकेत येते.
  • आता रक्त जवनिकेत मध्ये आल्यावर कर्णिका प्रसरण पावते व जवनिका आकुंचन पावते. त्याच वेळा झडपा बंद होवून रक्त परत मागे फेकले जात नाही व एकाच वेळेला फुफ्फुसाकडे आणि शरीराकडे रक्त पोहोचवले जाते.
  • यामधले डाव्या बाजूचे दोन कप्पे फुफ्फुसाकडुन ऑक्सिजन घेऊन आलेले रक्त हाताळतात. तर उजव्या बाजूचे दोन कप्पे शरीराला ऑक्सिजन पुरवून आलेले व फुफ्फुसाकडे नेण्यासाठी कार्बन डायऑक्साईड सोबत आणलेले रक्त सांभाळतात.

या प्रक्रियेत बिघाड झाल्यावर हृदयविकाराला सुरुवात होते. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या तीन प्रमुख रक्तवाहिन्या(circulation) असतात. या धमन्यांमध्ये कोलेस्टेरॉल, कॅल्शियम, रक्तातल्या लघुपेशी, पांढऱ्या रक्त पेशी काही ठिकाणी जमा होऊन रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करतात. यालाच धमनी काठिण्य असे म्हणतात.

शरीराबाहेर काढलेले हृदय

हृदयाचे आजार

[संपादन]
  • जन्मजात आजार
    1. जवनिकेच्या पडद्याला असणारे छिद
    2. कणिर्केच्या पडद्याला असणारे छिद
    3. हृदयाच्या झडपा आकुंचित असणे.
    4. हृदय उजव्याबाजुला असणे[१].
    • जोरजोरात श्वास घेणे , त्वचेवर, ओठांवर, बोटांच्या टोकांवर वा नखांवर निळ्या रंगाची छटा असणे आणि रक्त पुरवठा कमी असणे अशा प्रकारच्या लक्षणांचा समावेश असतो.
  • हृदयविकार
  • हृदयाघात

अधिक वाचन

[संपादन]


"हृदयन" ( Hridayan ) (उदा. हृदयन चेतन ठाकूर) हे नाव "हृदय" या संस्कृत शब्दाच्या प्रत्ययानुसार अर्थात "हृदयातील" असा अर्थ आहे.

आपल्या अंगातील एक महत्वाचं अंग आहे जो रक्त प्रवाह करण्याचे काम करतं. हृदयातील रक्त प्रवाह ही जीवनाच्या प्राणांच्या उपस्थितीसाठी आवश्यक आहे. हृदयाने रक्त प्रवाह करून शरीरातील अन्य अंगांना आवश्यक अगदी पोहोच देतो.

   "हृदयन" हे मुलांसाठी एक अत्यंत सुंदर नाव आहे.  ज्याने मुलांना एक विशेष आणि प्रिय अहसास देतो.  त्यांच्या मनातील संवेदनांचं आणि भावनांचं मौलिक अर्थ दर्शवतो, या नावाचा उपयोग त्यांना स्नेह, प्रेम, उत्साह आणि समर्पणाचं अभिवादन करतो. "हृदयन" हे नाव मुलांच्या व्यक्तिमत्वातील त्यांच्या प्रेमाचं आणि उत्साहाचं एक सुंदर अभिवादन करतो.

बाह्य दुवे

[संपादन]