उंदीर
उंदीर Late Miocene - Recent434 | ||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
House mouse, Mus musculus
| ||||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||||
| ||||||||||||||
जीव | ||||||||||||||
30 जीव; see text |
उंदीर हे भगवान गणेशाचे वाहन आहे.
धार्मिक पार्श्वभूमी
[संपादन]आपल्याकडे विविध देव देवतांची विशिष्ठ वाहने आहेत. त्यापैकी उंदीर हे गणपतीचे वाहन आहे असे मानले गेले आहे. भाद्रपदातील गणेशोत्सवाच्या काळात गणपतीबरोबरच उंदराचीही पूजा केली जाते.
शारीरिक संरचना
[संपादन]उंदीर आकाराने लहान असतो, वजन ३०-५० ग्रॅ., लांबी ८-१० सेंमी. आणि शेपूट बारीक व शरीराएवढ्या लांबीचे असते. शरीराचे डोके, मान, धड आणि शेपूट असे चार भाग असतात. कान मोठे व मुस्कट छोटे टोकदार असून त्याच्या दोन्ही बाजूंस दृढरोम असतात. अग्रपाद आणि पश्चपाद सारख्या आकाराचे व आखूड असतात. वृषणकोश छोटे आणि आखूड असतात. त्याच्या लेंड्या लहान आकाराच्या व संख्येने अधिक असतात.
प्रजनन
[संपादन]उंदरिणीची गर्भावस्था १९-२० दिवस व दुग्धकाल १३-१४ दिवसांचा असतो. पिले जन्मत: केसहीन असून जन्मल्यानंतर दहाव्या दिवशी त्यांच्या अंगावर पूर्ण केस येतात. एका विणीमध्ये मादी उंदरास ५-१० पिले होतात. पिलांचे डोळे तिसऱ्या दिवशी उघडतात.
आढळणारे प्रदेश
[संपादन]उंदीर मुळात पाकिस्तानमध्ये असलेल्या गवताळ प्रदेशामध्ये होते. दहा हजार वर्षांपूर्वी मानवाने शेतीस प्रारंभ केल्यानंतर मानवी स्थलांतराबरोबर मस उंदीर जगभर स्थलांतरित झाले.
विविध जाती
[संपादन]संभावित नुकसान
[संपादन]उंदीर हे धान्य खातातच पण त्यापेक्षा धान्याची नासाडी अधिक करतात. सतत कुरतडण्याच्या सवयीमुळे कागद, कपडे, लाकूड, इमारती यांची हानी होते. विजेच्या आणि अवगुंठित तारा कुरतडल्यामुळेही नुकसान होते. उंदरावर असलेल्या पिसवांमधून एके काळी प्लेगसारखा संसर्गजन्य रोग पसरलेला होता. उंदराच्या मूत्रामधील लेप्टोस्पायरा या जीवाणूमुळे मानवामध्ये लेप्टोस्पायरोसिस आजार होतो.
बाह्य दुवे
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |