मैत्री दिन
मैत्री साजरी करण्याचा दिवस | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | जागतिक दिवस | ||
---|---|---|---|
स्मरणोत्सव | |||
Organizer | |||
आरंभ वेळ | इ.स. १९५८ | ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
भारतामध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिवस किंवा मैत्री दिन साजरा केला जातो. इ.स. १९५८ पासून पेरुग्वेमध्ये सुरू झालेला हा जागतिक मैत्री दिन उपक्रम दक्षिण अमेरिकेतील बहुतांशी देशात आवर्जून साजरा केला जातो. या दिवशी मित्र- मैत्रिणी परस्परांना मैत्री दिवसाच्या शुभेच्छा देतात, रंगीत धागे बांधतात, फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देतात आणि आपली मैत्री चिरंतन राहो अशा सदिच्छा व्यक्त करतात.[१] [२]
पार्श्वभूमी
[संपादन]शुभेच्छापत्रे तयार करणाऱ्या उद्योजकांकडून या दिवसाचा विशेष प्रचार झाला आणि प्रसार माध्यमांमुळे या दिवसाचे महत्त्व जगभरातील लोकांनी स्वीकारले.
इतिहास
[संपादन]हॉलमार्क या शुभेच्छापत्रे तयार करणाऱ्या व्यवसायाचा जनक जॉयस हॉल याने २ ऑगस्ट या दिवशी लोकांना मैत्री व्यक्त करण्याची संधी देणारा दिवस सुरू केला. याला समाजातून प्रारंभी विरोध झाला, कारण यामागील उद्योजकता वाढविण्याचा हेतू समाजात स्वीकारला गेला नाही. मात्र १९९८नंतर या दिवसाला विशेष मान्यता मिळत गेली. या दिवशी एकमेकांना बांधण्यासाठी बनवलेले रंगीबेरंगी हस्तबंध आता भारत, नेपाळ, बांगलादेश आणि दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर मिळतात. पेरुग्वेमध्ये २० जुलै १९५८ रोजी डॉ. रामोन आरटिमो ब्राचो यांनी जागतिक मैत्री दिवस ही संकल्पना मांडली.[३]
जागतिक स्तरावर
[संपादन]हा दिवस विविध देशात वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो, पण त्याचा हेतू सर्वत्र सारखाच असतो.
- पेरु- जुलै महिन्याचा पहिला शनिवार
- पेरुग्वे- ३० जुलै
- ब्राझील- २० जुलै[४]
- भारत- ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार
संदर्भ
[संपादन]- ^ "Friendship Day 2018 Gift Ideas: 7 gifts to add a personal touch to your friend's life (2.8.2018)". Unknown parameter
|deadurl=
ignored (सहाय्य) - ^ Bose, Antara (1 August 2009). "Flavours of friendship". The Telegraph. Calcutta. Retrieved 18 September 2013.
- ^ UN Res.A/65/L.72
- ^ Freitas, Andréa Marcondes de. "Migração partidária na Câmara dos Deputados". Cite journal requires
|journal=
(सहाय्य)