Jump to content

आयसेनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आयसेनी, आयसेनाय किंवा इसेनी ही पूर्व ब्रिटनमधील लोहयुग आणि सुरुवातीच्या रोमन युगातील एक प्राचीन जमात होती. ही जमात सध्याचे नॉरफोक, सफोक तसेच केंब्रिजशायरच्या काही भागांमध्ये राहत असे. रोमन काळात त्यांची राजधानी सध्याच्या कैस्टोर सेंट एडमंड येथे व्हेंटा आइसेनोरम या नावाने होती. [] []

ज्युलियस सीझरने आपल्या इ.स.पू. ५५ आणि इ.स.पू. ४५मध्ये ब्रिटनवर केलेल्या आक्रमणांबद्दल आयसेनींचा उल्लेख केलेला नाही. इ.स. ४३ मध्ये क्लॉडियसच्या ब्रिटनच्या विजयादरम्यान पूर्व ब्रिटनमध्ये आयसेनी एक मोठी सत्ता होती. त्यांनी रोमशी युती केली होती. त्यांच्या कारभारात रोमने लुडबुड सुरू केल्याने आयसेनींनी इ.स. ४७मध्ये बंड केले आणि इ.स. ६० पर्यंत त्यांच्या राजा प्रासुटागसच्या काळात ते नाममात्र तरी स्वतंत्र होते. प्रासुटागसच्या मृत्यूनंतर रोमन साम्राज्याने आयसेनींवर अतिक्रमण सुरू केल्यावर प्रासुटागसची पत्नी बूडिकाने ६०-६१मध्ये पुन्हा एकदा उठाव केला आणि थेट लंडनियम (आताचे लंडन) वर धडक मारून शहर आणि आसपासचा प्रदेश बेचिराख करून टाकला. ब्रिटनमधील रोमन राजवट धोक्यात आलेली पाहून रोमन साम्राज्याने मोठी कुमक पाठवली आणि शेवटी हे बंड चिरडून काढले. त्यानंतर आयसेनी रोमन साम्राज्यात हळूहळू सामील झाले. [] []

जॉन ओपी(१७६१-१८०७) ने काढलेले बोडिसिया ब्रिटिश लोकांना भाषण देते आहे हे चित्र

संदर्भ

[संपादन]