Jump to content

abandon

Wiktionary कडून

क्रि०

१. (एखादी वस्तू, सवय, स्वभाव, भावना इ०) त्यागणे; टाकणे; सोडणे; सोडून देणे; वर्ज करणे; सांडणे; ए०गो०चा त्याग करणे; (मनातून, स्वभावातून, आठवणीतून) काडून टाकणे, घालवून देणे. उदा० धीर सांडू नकोस; यश नक्की मिळेल.

२. (ए०गो०) मागे ठेवणे; सोडून जाणे; मागे सोडणे; परित्याग करणे; अंतरणे; अंतर देणे उदा० जहाज बुडू लागताच कप्तानाने ते सोडून देण्याचा आदेश दिला.

३. (ए०गो०) (अचानकपणे, अवचितपणे, अनपेक्षितपणे, मध्येच) थांबवणे; सोडून देणे. उदा० पावसाळी वातावरणामुळे त्यांना खेळ अर्धवटच सोडून द्यावा लागला.

४. (ए०गो०चा) (अचानकपणे, अवचितपणे, अनपेक्षितपणे, मध्येच) आधार-पाठिंबा काढून घेणे; वार्‍यावर सोडणे. उदा० स्वतःच्या मुलांनीही वार्‍यावर सोडून दिल्यावर वृद्धाश्रमात जाऊन राहण्याशिवाय तिला पर्यायच उरला नाही.

५. (एखादे तत्व-विचार-कल्पना) सोडून देणे; त्याचा परित्याग करणे. उदा० जुनाट आणि निरुपयोगी म्हणून सोडून दिलेल्या आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाचे महत्व त्याचे पाश्चात्यांनी कौतुक केल्यावरच आपल्या ध्यानात येते. (पहा give up)

६. A० oneself to: अविचारीपणे ए०गो०च्या स्वतः अधीन होणे; बुडून जाणे किंवा स्वतःस सुपूर्द/अधीन करणे; नाद/छंद लागणे/घेणे/धरणे. (पहा subject oneself to) उदा० अशा परिस्थितीत नैराश्यात बुडून जाण्यापेक्षा आशावादी राहून पुढील कामास लागणे हे नक्कीच योग्य ठरेल. पहा relinquish; renounce; surrender; resign; waive; abdicate

(with gay/wild) :ना० अनिर्बंध स्वातंत्र्य; बेफिकिर-उन्मत्त वर्तणूक