Jump to content

चलनवाढ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
2019

महागाई मोजणाचं परिमाण म्हणजे चलनवाढ आहे. एखाद्या विशिष्ट कालावधीत वस्तूसेवांच्या किंमत पातळीवर होणारी अनियंत्रित वाढ म्हणजे चलनवाढ होय. चलनवाढीमुळे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात,म्हणून 'चलनवाढ' किंवा  'महागाई ' हे शब्द एकमेकांना आलटून पालटून त्या त्या परिस्थिती अनुसार वापरले जातात. मात्र चलनाची क्रयशक्ती कमी होत असते. चलनवाढीमुळे रोजगारनिर्मितीची क्षमता वाढते.

इतिहास

[संपादन]

ज्ञात इतिहासात सुमारे इ.स १९२० पर्यंत बहुतेक देशांत चलनाचा पुरवठा हा देशातील सोन्याच्या साठ्याशी निगडित असत असे. सोने तारण म्हणून ठेवले जाई व त्यानुसार किमती स्थिर राहत असत. त्या काळात भाववाढीची समस्या तीव्रतेने भासत नसे. दुसऱ्या महायुद्धानंतर सोन्याशी असलेला चलनाचा संबंध सुटला. या काळातील विचारानुसार उत्पादन वाढले की रोजगार वाढतो. परिणामी मागणी वाढते. त्यामुळे पुन्हा उत्पादनाला चालना मिळते. म्हणून उत्पादनवाढीचा प्रयत्न सातत्याने हवा असा विचार सरकारचा असे.

चलनवाढीची  मुख्य  कारणे

१) मागणी ताणजन्य चलनवाढ

२) खर्चदाबजन्य  चलनवाढ


भारतातली चलनवाढीची कारणे

[संपादन]
  • तुटीचे अंदाजपत्रक सरकारने सादर करणे
  • ही तूट भरून काढण्यासाठी रिर्झव्ह बँकेला नोटा छापण्याचा आदेश दिला जातो
  • परदेशात काम करणारे भारतीय नातेवाईकांना पैसे पाठवतात.
  • ज्या भारतीयांचे परदेशात उद्योग असतात, ते झालेला नफा भारतात पाठवतात.
  • परदेशी भांडवलदार भारतात गुंतवणूक करतात ही गुंतवणूक चलनात दाखल होते.
  • काही देशांत भारतीय चलनाच्या नकली नोटा छापून भारतीय अर्थव्यवस्थेत घुसवल्या जातात.

या कारणांनी चलनवाढ होते व त्याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणून भाववाढ होते.

हे सुद्धा पहा

[संपादन]